VIDEO | अंगाचा थरकाप उडवणारा या बोट दुर्घटनेचा थरार, 14 जणांना जलसमाधी

साम टीव्ही
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

राजस्थानच्या गोठडा कला गावातील नदीत 14 जणांना जलसमाधी मिळाल्याची धक्कादायक घटना घडली. चंबळ नदीमध्ये एका प्रवासी बोटीतून 40 जण प्रवास करत होते. बोटीने किनारा सोडल्यानंतर अवघ्या काहीच अंतरावर बोट कलंडली. आणि 14 जणांना जलसमाधी मिळाली.

एक धक्कादायक बातमी आहे राजस्थानधून. राजस्थानच्या गोठडा कला गावातील नदीत 14 जणांना जलसमाधी मिळाल्याची धक्कादायक घटना घडली. चंबळ नदीमध्ये एका प्रवासी बोटीतून 40 जण प्रवास करत होते. बोटीने किनारा सोडल्यानंतर अवघ्या काहीच अंतरावर बोट कलंडली. आणि 14 जणांना जलसमाधी मिळाली.

अपघाताची ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने ही बोट कलंडल्याचं सांगण्यात येतंय. या बोटीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि लहान मुलंसुद्धा होती. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून युद्धपातळीवर नदीत शोधमोहिम राबवण्यात आलीय. तसंच स्थानिकांचीसुद्धा मदत घेण्यात येतेय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

पाहा अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा थरारक व्हिडिओ-


संबंधित बातम्या

Saam TV Live