नथुराम गाेडसेची भूमिका राजकुमार रावने नाकारली

नथुराम गाेडसेची भूमिका राजकुमार रावने नाकारली

मुंबई : निवडक चित्रपटात काम करून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे राजकुमार राव होय. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिलेक्टेड भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते. 

पण सध्या तो खुपच निवडक भूमिका साकारत आहे. याचे कारण 'स्त्री' चित्रपटानंतर रिलीज झालेल्या त्याच्या सहामधील पाच चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. त्यामुळे त्याने राजकुमार संतोषी यांनी ऑफर केलेल्या 'गांधी वर्सेस गोडसे'मध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

खरं तर संतोषी यांनी राजकुमारला नथुराम गोडसेची भूमिका ऑफर केली होती. मात्र राजकुमार करिअरच्या या स्टेजवर नकारात्मक भूमिका करू इच्छित नाही.

गोडसेेची भूमिका का नाकारली : राजकुमारने नुकतेच 'जजमेंटल है क्या'मध्ये सायको किलरची भूमिका केली होती. ती त्याच्या चाहत्यांना आवडली नाही. त्यामुळे राजकुमारने संतोषी यांना नकार दिला असावा. दुसरे कारण असे की, गोडसेेविषयी राजकुमारने आपले मत अजून व्यक्त केले नाही. राजकीयदृष्ट्या पाहिले तर गोडसेला उजव्या विचारसरणीने नेहमी नायक आणि डाव्या विचारसरणीने खलनायक म्हटले आहे. दुसरीकडे राजकुमारने कधीच आपली राजकीय विचारसरणी सांगितली नाही.

Webtitle: Rajkumar Rao refused to play Nathuram Godse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com