धर्मेंद्रच्या 'चुपके चुपके' च्या रिमेकमध्ये राजकुमार राव, साकारणार परिमल त्रीपाठीची भूमिका

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

नवी मुंबई : 1975 ची हिट फिल्म आणि क्लासिक कॉमेडी चित्रपट 'चुपके चुपके' चा रिमेक बनत आहे. या सिनेमात राजकुमार राव हा धर्मेंद्र यांनी साकारलेल्या डॉ. परिमल त्रिपाठीच्या भूमिकेत दिसेल. राजकुमार राव ने याविषयीची अधिकृत माहिती 'मेड इन चायना' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिली आहे. राजकुमार राव म्हणतो की, "धर्मेंद्र यांनी साकारलेली भूमिका साकारण्यासाठी माझ्यावर मोठी जबाबदारी आहे". धर्मेंद्र यांच्या या सिनेमातील विनोदी भूमिकेमुळे त्यांचं बरंच कौतुक झालं होतं. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या विनोदी सिनेमात बॉलिवूडच्या कॉमेडी फिल्म्स च्या यादीत खास जागा आहे.

याचवर्षी अशीही चर्चा रंगली की या सिनेमासाठी राजकुमार राव ला 9 कोटी इतकं मानधन दिलं जात आहे. जर असं असेल तर राजकुमार रावच्या आत्तापर्यंतच्या सिनेमा सिनेमानं पैकी हे मानधन जास्त असेल.
राजकुमार राव हा सध्याचा टॉपचा अभिनेता मानला जात आहे. राजकुमार रावच्या खात्यात यावर्षी तीन सिनेमे आले आहेत. ज्यात ' एक लडकी को देखा तो ऐसा लगा', 'जजमेंटल हैं क्या ' आणि 'मेड इन चायना ' हे सिनेमे सहभागी आहेत. आत्तापर्यंत केलेल्या सिनेमांमधून राजकुमारला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली आहे. त्यामुळे 'चुपके चुपके'च्या रिमेक मधून राजकुमार कमालच करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 
       
चुपके चुपके'च्या रिमेक चं टायटल अद्याप फायनल झालेलं नाही. साजिद - फरहाद ही जोडी सिनेमाचं स्क्रिप्ट लिहीत आहेत. धर्मेंद्र यांच्या 'चुपके चुपके' सिनेमात स्वर्गवासी ओमप्रकाश यांनी साकारलेली भूमिका आता रिमेकमध्ये परेश रावल साकारतील. या सिनेमात धर्मेंद्र आणि अमिताभ यांची जोडी खास आकर्षण होतं, म्हणूनच अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर आणि जया बच्चन यांच्या भमिका या रिमेकमध्ये कोण साकारणार हेही अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Web title : Rajkummar Rao in the remake of 'Chupke Chupke'He Will Play Dharmendra Role

संबंधित बातम्या

Saam TV Live