आज भारताच्या भात्यात दाखल होणार राफेल 

आज भारताच्या भात्यात दाखल होणार राफेल 

विजयादशमीच्या मुहूर्तावर भारताला पाहिलं राफेल विमान मिळणार आहे. फ्रान्सकडून पाहिलं राफेल फायटर जेट भारताला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्समध्ये दाखल झालेत. पॅरिसमध्ये हा हस्तांतरणाचा सोहळा पार पडणारे. राजनाथ सिंह राफेल फायटर जेटचं शस्त्रपूजन देखील करणार आहेत. 36 राफेलपैकी पहिलं राफेल फायटर जेट आज भारताकडे सुपूर्द करण्यात येणारे.

राफेलची काही ठळक वैशिष्ठ्य : 

राफेल विमानाचा वेग प्रतितास 2,223 किलोमीटर आहे
राफेल विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं
राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं
राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे
राफेल विमानाला मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं
राफेलची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं
राफेल हे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे, त्याचसोबत राफेल विमान वेगवेगळ्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करू शकतं.

राफेल भारतात येत असल्याने सगळेच उत्साही असल्याचं मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलंय. राफेल हे अत्यंत अद्ययावत लढाऊ विमान असून हे विमान कोणत्याही मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. 

WebTitle : marathi news Rajnath Singh To Officially Receive First Rafale Fighter Jet Today

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com