राजस्थानात ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान भीषण दुर्घटना ; 250 जण जखमी, 50 गंभीर

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 जुलै 2018

राजस्थानात ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 250 हून अधिक जण जखमी झाले असून, यामध्ये 50 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना राजस्थानातील श्रीगंगानगर येथे आज (रविवार) घडली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

राजस्थानच्या पदमपूर येथे ट्रॅक्टर स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक जणांनी गर्दी केली होती. मात्र, ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या नागरिक ज्या जागेवर उभे होते. तो रेसिंग ट्रेकचा भाग अचानकपणे कोसळल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये 250 हून अधिक लोक दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 50 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले असून, जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी वैद्यकीय पथकही पोचले आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live