(VIDEO) रक्षाबंधनामुळे उद्या #मुंबई लोकलचा #मेगाब्लॉक नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. यंदा मात्र रक्षाबंधन रविवारी आल्यामुळे रविवारचा ब्लॉक रद्द करण्यात आलाय. मुंबईकरांचा संभाव्य त्रास लक्षात घेत, मध्य आणि पश्चिम रेल्वेने दिवसा ब्लॉक रद्द केलाय.

मात्र, वसई रोड-विरार स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेणार असल्याची घोषणा पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आलीय. यावेळी अप आणि डाउन धिम्या मार्गावर शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत जंबोब्लॉक घोषित केलाय.

रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाहीय. तर मध्य मार्गासह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live