उपोषणकर्त्या अण्णांच्या स्टेजवर राज ठाकरे..

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

लोकपाल विधेयक आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींसाठी अण्णा गेल्या 6 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. या आंदोलनाचा कुणीही राजकीय फायदा उचलू नये, याकरत अण्णांनी आंदोलनाआधीच वेगळी नियमावली सुद्धा जाहीर केली होती. ज्यामध्ये, कोणत्याही राजकीय नेत्याला स्टेजवरुन भाषणास बंदी घालण्यात आली होती.

मात्र, राज ठाकरेंची आंदोलनकर्त्या अण्णा हजारेंसोबत बंद दाराआड स्टेजवर चर्चा झाली. आणि त्यानंतर क्षणार्धात सर्व नियम धाब्यावर बसवत राज ठाकरेंना व्यासपीठावर प्रवेशच दिला नाही तर मेहेरनजर करत थेट माईक राज ठाकरेंच्या हाती सोपवला. अन् त्यानंतर राजसाहेबांनीही संधीचं सोनं करत, अण्णांच्या व्यासपीठावरुन शाब्दीक गोळाफेक करण्याची नामी संधी सोडली नाही

दरम्यान, अण्णांच्या आंदोलनामुळे मोदी सत्ते आले, मात्र सरकारनं अण्णांची फसवणूक केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. इतकंच नाही, तर अण्णांनी फार ताणू नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्लाही राज ठाकरे यांनी केलाय. 

WebTitle :marathi news ralegansiddhi raj thackeray meets anna hazare give speech from his podium too

संबंधित बातम्या

Saam TV Live