राम जन्म भूमी आणि बाबरी मशीद खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरूवात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीला... आजपासून सुप्रीम कोर्टात सुरूवात होत आहे... या प्रकरणावरील सुनावणी आणखी टाळता येणार नाही, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने गेल्या सुनावणीला स्पष्ट केले होते.,, तर, सुनावणी घाईत न घेता ती जुलै 2019च्या नंतर घेण्यात यावी अशी मागणी... मुस्लिम पक्षकारांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे 5 डिसेंबरला केली होती.... तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होतेय...यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टानं वादग्रस्त जमिनीचे तीन भाग केले.

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीला... आजपासून सुप्रीम कोर्टात सुरूवात होत आहे... या प्रकरणावरील सुनावणी आणखी टाळता येणार नाही, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने गेल्या सुनावणीला स्पष्ट केले होते.,, तर, सुनावणी घाईत न घेता ती जुलै 2019च्या नंतर घेण्यात यावी अशी मागणी... मुस्लिम पक्षकारांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे 5 डिसेंबरला केली होती.... तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होतेय...यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टानं वादग्रस्त जमिनीचे तीन भाग केले. त्यात एक हिस्सा सुन्नी वक्फ बोर्ड एक भाग निर्मोही अखाडा आणि तिसरा भाग राम ललासाठी वाटून देण्याचा निर्णय दिला होता... आता सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live