तरुणींबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार यांना अखेरीस उशिराचं शहाणपण सुचलं

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

दहीहंडीच्या दिवशी तरुणाईशी संवाद साधताना, तरुणींबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार यांना अखेरीस उशिराचं शहाणपण सुचलं. आणि उघड वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर, ट्विटद्वारे माफी मागितली.

तब्बल तीन दिवसांनंतर राम कदम यांनी माफी मागितल्यानंतर, वरातीमागून घोडं. अशी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे. राम कदमांनी दहीहंडीच्या दिवशी, मुलीला पळवून नेण्याचं धक्कादायक विधान केलं होतं.

त्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून राम कदम यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर, ठिकठिकाणी आंदोलनंसुद्धा करण्यात आली. राज्यातलं वातावरण तीन दिवस ढवळून निघाल्यानंतर अखेरीस कर्तृत्ववान आमदार राम कदमांनी ट्विटद्वारे माफी मागितली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live