राम कदम यांच्याविरोधात मनसेची पोस्टरबाजी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

मुलगी नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणू असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात मनसेने बॅनरबाजी केली. घाटकोपरमध्ये तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानासमोर मनसेने बॅनर लावलेत. हे बॅनर पहाटे पोलिसांनी काढले असून घाटकोपरमधील बॅनरबाजी प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. 

आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान केले. एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे राम कदम यांनी म्हटले होते.  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राम कदम यांच्यावर टीका केली आहे. तर मनसेने बॅनरबाजी करत राम कदम यांच्या विधानाचा निषेध दर्शवला. मनसेने घाटकोपरमध्ये आणि मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर बॅनर लावले.

WebTitle : marathi news ram kadam derogatory statement on women mns  puts poster against bjp mla 

संबंधित बातम्या

Saam TV Live