राम कदम यांना 8 दिवसात उत्तर देण्याचे आदेश;  बेताल वक्तव्याची राज्य महिला आयोगाने घेतली दखल

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान राम कदमांनी मुलींबाबत केलेल्या बेताल वक्तव्याची, राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून. स्युमोटो दाखल करून आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश राम कदम यांना दिले आहेत.

महिलांबाबत वक्तव्य करताना आमदार राम कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती असं मत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याआधीच व्यक्त केले आहे. आता स्युमोटो दाखल केल्यानंतर राम कदम यांनी या प्रकरणात 8 दिवसात उत्तर द्यावे असेही आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.

राम कदम यांनी केलेल्या या बेताल वक्तव्यानंतर त्यांच्यावर समाजातल्या सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे.

WebTitle : marathi news ram kadam mahila aayog vijaya rahatkar controversial statement 

संबंधित बातम्या

Saam TV Live