ट्विटरवरून राम कदम यांची सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली; वादात सापडलेल्या राम कदमांची आणखी एक घोडचूक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

बुडत्याचा पाय खोलात ही म्हण आपण लहानपणापासून ऐकतो. भाजप आमदार राम कदम यांना सध्या ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडतेय.

मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन सुरू असलेला वाद ताजा असतानाच राम कदम यांनी आणखी एक डॅशिंग पराक्रम केलाय. बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबतचे ट्विट करत राम कदम यांनी सोनालीला श्रद्धांजली वाहिली. या नवीन प्रतापामुळे राम कदमांवर पुन्हा चौफेर टीकेची झोड उठू लागलीय.

''हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोऴ्यांचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड. यांचे अमेरिकेत निधन झाले आहे'', अशा आशयाचे ट्विट राम कदम यांनी केले होते. सोशल मीडियावर सडकून टीका झाल्यानंतर राम कदम यांनी ट्विट डिलीट केलंय.
या ट्विटवरुन वाद निर्माण होताच राम कदम यांनी तातडीनं ट्विट डिलिट केलं आणि एक नवीन ट्विट केलं. 

''गेल्या दोन दिवसांपासून सोनाली बेंद्रे यांच्याबाबतची अफवा पसरली होती. त्यांच्या स्वास्थ्यासाठी व  प्रकृतीत  लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो'', असे ट्विट करत राम कदम यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. सोनाली उपाचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचं म्हटलं जातंय. आजच तिनं इन्स्टाग्रामवर एक नवीन फोटो अपलोड केलाय. त्यातच राम कदम यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनाली बेंद्रेंच्या निधनाची पोस्ट केली गेली. त्यामुळं राम कदम पुन्हा एकदा ट्रोल आहेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live