2019 पूर्वी अयोध्येत राम मंदिराचं काम सुरू करणार; भाजपाध्यक्ष अमित शाह यांचं हैदराबादमध्ये वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 जुलै 2018

2019 पूर्वी अयोध्येत राम मंदिराचं काम सुरू करणार असल्याचा दावा भाजपच्या तेलंगणा प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत अमित शहा यांनी केलाय. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा गाजणार असं दिसतंय.

ध्या न्यायालयीन घटनाक्रम पाहता राम मंदिराच्या बांधकामास लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुरुवात होईल, असा विश्वास अमित शहा यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पी. शेखर यांनी सांगितलं.

दरम्यान, राम मंदिर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया येत नव्हती. मात्र, अमित शहा यांनी त्यावर पहिल्यांदाच मौन सोडल्याने आगामी काळात राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

'राम मंदिराच्या नावावरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घरोघरी जाऊन मते मागितली होती. आता राम मंदिर न उभारल्यास भाजप रसातळाला जाईल,' अशी कठोर टीका माजी खासदार आणि राम मंदिर जन्मभूमी न्यासाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रामविलास दास वेदांती यांनी दोन दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ यांच्यासमोरच एका कार्यक्रमात केली होती. त्यानंतर शहा यांनी हे विधान केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live