2019 नंतर राम मंदिर प्रचाराचा मुद्दा राहणार नाही: संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

अयोध्या : अयोध्येत 25 वर्षांपूर्वी जे झाले ते रेकॉर्डवर आहे. अखिलेश यादव यांनी अयोध्येत लष्कर तैनात करण्याची मागणी केली असली तर आम्हाला फरक पडत नाही. फक्त त्यांनी सांगावे लष्कर भारताचे असेल की पाकिस्तानचे. 2019 नंतर राम मंदिर हा मुद्दा प्रचाराचा राहणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

अयोध्येत राममंदिर उभारणीची घोषणा चुनावी जुमला असल्याचे जाहीर करण्याचे आव्हान देत भाजपला आव्हान देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्यास आजपासून (ता. २४) सुरवात होत आहे. संजय राऊत यांच्यासह हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले असून, त्यांच्याकडून भाजपला आव्हान देण्यात येत आहे.

संजय राऊत म्हणाले, की अयोध्येत आमची कोण कोंडी कोणी करू शकत नाही. आम्ही येथे पाय रोवून उभे आहोत. उद्धव यांचा कार्यक्रम ठरला आहे. चांदीची विट बनवून ती न्यास अध्यक्षांना पाठविणार आहे. आम्ही कधी राजकारण केेले नाही. राम हा आमचा राजा आहे, आम्ही भीक मागत नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राम मुद्धा प्रचारासाठी राहणार नाही.

WebTitle : marathi news ram mandir in ayodhya shivsena sanjay raut politics 

संबंधित बातम्या

Saam TV Live