'सरकार नाही झालं तरी चालेल पण राम मंदिर होणारच' अयोध्येत उद्धव ठाकरेंची डरकाळी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीवर जाऊन सहकुटुंब रामलल्लाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेतली. अयोध्येत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केलाय. अयोध्येत येण्यामागे कोणाताही छुपा अजेंडा नव्हता असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, इथे आल्यावर जेलमध्ये आल्यासारखं वाटत होतं असं म्हणत उद्धव ठाकरे म्हणालेत.  

राम मंदिर कधी बांधणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंच्या भावना घेऊन मी अयोध्येत आलो. निवडणुका आल्या की रामराम आणि नंतर आराम करतात, असा टोला त्यांनी लगावला. राम मंदिरासाठी किती दिवस वाट पाहायची. राम मंदिर होत नाही, याचंच दुःख वाटतंय. असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. मंदिर बनलं नाही, तर सरकार राहणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. त्याचबरोबर हिंदूंच्या भावनांशी खेळू नका असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. रामाला आता वनवासातून बाहेर काढा असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

अयोध्या दौरा यशस्वी झाल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकार, पोलीस प्रशासन, अयोध्यावासीय आणि साधु-संतांचे आभार मानले. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live