VEDIO | पूर्ण झाल्यानंतर असं दिसेल राम मंदिर!

साम टीव्ही
बुधवार, 5 ऑगस्ट 2020
  • पूर्ण झाल्यानंतर असं दिसेल राम मंदिर!
  • भूमिपूजनाआधी राम मंदिराचं प्रस्तावित मॉडेल समोर
  •  राम जन्मभूमी ट्रस्टकडून फोटो जारी

प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार आहे. पण त्याआधीच भक्तांना मंदिर कसं असेल. त्याची रचना काय आहे. किती मोठंय हे मंदिर असे प्रश्न पडू लागले. या सगळ्यांची उत्तरं आज साम टीव्हीवर आम्ही तुम्हाला देणार आहे. राम मंदिराची पहिली झलक आज आम्ही तुम्हाला दाखवतोय.

कित्येक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर राम मंदिर मूर्त स्वरुपात येणार आहे. उद्या राम मंदिराची पहिली वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त रचली जाणार आहे. यासाठीची सर्व तयारी आता पूर्ण झालीय. याच दरम्यान राम मंदिर समितीकडून मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आलीय. ही प्रतिकृती विश्व हिंदू परिषदेच्या मंदिराच्या रचनेपेक्षा वेगळी आहे.

कसं असेल हे मंदिर पाहा

  • राम मंदिराला ५ घुमट असणार आहे. आधीच्या प्रतिकृतीत 3 घुमट होते.
  • शिवाय मंदिराच्या शिखराची उंची 161 फूट असेल. रामाचं हे भव्य मंदिर तीन मजली असेल आणि वास्तूशास्रानुसार त्याची रचना केली जाणार आहे.
  • शिवाय राम मंदिराची उंचीही 33 फुटांनी वाढवण्यात आलीय. त्यामुळं जमिनीपासून मंदिराची उंची तब्बल 300 फुटांपर्यंत असणार आहे.
  • मंदिराला तब्बल 308 खांब असणार आहे. मंदिराच्या तळालाच 106 स्तंभ उभे केले जाणार आहे. 
  • जिथं रामललाचं गर्भगृह बनवलं जाणार आहे, त्याच्या वरील भागातच मंदिराचं शिखर असणार आहे.
  • इतर 4 घुमटांखाली सिंहद्वार, नृत्यमंडप, रंगमंडप असणार आहे. इथं भक्तांच्या बसण्याची, ध्यानाची व्यवस्था असेल. शिवाय धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठीही इथं जागा असेल.

आधीपेक्षा मोठ्या जागेवर हे मंदिर उभारलं जाणार आहे. शिवाय मंदिराला तेच दगड लावले जातील, जे मंदिराच्या कार्यशाळेत तासले गेले आहेत. दिल्लीतल्या एका कंपनीला याचं कंत्राट देण्यात आलंय.

मंदिर निर्माणासाठी माती परीक्षणही करण्यात आलंय. आणि त्यानुसार 20 ते 25 फूट खोल पाया खोदण्यात येणार आहे. यावर प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभं राहणार आहे. जे मंदिर जगाला एकतेचा, सप्रभुतेचा आणि सदाचाराचा संदेश देईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live