VIDEO | पाहा, अंधश्रद्धेचा सोनेरी कासव

साम टीव्ही
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

 

  • रामाची अयोध्या नेपाळमध्ये ?
  • गौतम बुद्ध नेपाळचेच ?
  • विष्णूच्या रूपात अवतरला सोनेरी कासव ? 

सध्या नेपाळमध्ये एका कासवाची जोरदार चर्चा सुरू आहे. इतकी की, इथले लोक या कासवाला विष्णूचा अवतार मानू लागलेत. अंधश्रद्धेचा हा सोनेरी कासव पाहण्यासाठी लोकांच्या अक्षरश: रांगा लागू लागल्या आहेत. 

एकीकडे आपण आधुनिकतेचा गाजावाजा करतोय तर दुसरीकडे अंधश्रद्धा आपली पाठ सोडायला तयार नाही त्याचं हे उदाहरण...

हे दृश्य आहे नेपाळमधलं..धनुष जिल्ह्यातल्या धनुषधाम इथं सध्या एका कासवाच्या दर्शनासाठी रांग लागलीय..कारण हे कासव इतर कासवांपेक्षा वेगळयं. या कासवाचा रंग सोनेरी आहे. विशेष म्हणजे इथले लोक या कासवाला चक्क विष्णूचा अवतार मानू लागलेत. आणि त्यामुळे या कासवाच्या दर्शनासाठी अक्षरश: रांग लागलीय. दरम्यान ओडीशातल्या बालसोरमध्ये सापडलेल्या एका सोनेरी कासवाचा व्हिडीओ देखील या फोटोसोबत व्हायरल केला जातोय. 

वन्यजीव तज्ञ कमल देवकोटा यांनी या कासवाला नेपाळच्या संस्कृतीत विशेष स्थान असल्याचं म्हंटलंय. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, कासवाच्या कवचाच्या वरील भागाला आकाश आणि खालील भागास पृथ्वी जातं. नेपाळमध्ये सोनेरी रंगाचा हा पहिलाच कासव आहे. सगळ्या जगात अशाप्रकारचे फक्त पाच कासव आहेत. त्यामुळे आमच्यासाठी हा महत्वाचा शोध असल्याचं देवकोटा यांचं म्हणणं आहे. 

तर, दुसरीकडे तज्ञांच्या माहितीनुसार, कासवांच्या जनुकीय बदलामुळे कासवाचा रंग सोनेरी झालाय. 
आता या कासवावरून वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जातायेत. पण हा अंधश्रद्धेचा कासव नेपाळमध्ये आला कुठून ? 

90 च्या दशकात गणपती दूध पितो अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. आज य़ा घटनेला 25 वर्ष उलटली. मात्र या 25 वर्षात देशांच्या राजकारणावर धर्माचा पगडा दिवसेंदिवस घट्ट होत गेला. आता कासवाच्या रूपात विष्णूनं अवतार घेतला हेही त्याच अंधश्रद्धेचं एक प्रतिबिंब.


संबंधित बातम्या

Saam TV Live