...तर मी 35-40 रुपये प्रति लिटरने पेट्रोल-डिझेल विकेन - रामदेवबाबा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी सरकारवर टीका होत असतानाच, योगगुरू रामदेवबाबा यांनी 'मला परवानगी दिली तर मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची विक्री करेन' असे वक्तव्य केले आहे. तसेच भाजपचा प्रचार करणार का असा सवाल केल्यावर त्यांनी 'आता भाजपचा प्रचार करणार नाही,' असे उत्तर दिले. 

'मला पेट्रोल पंप चालवण्याची परवानगी व करात थोड्याफार प्रमाणात सवलत मिळाली तर 35-40 रुपये प्रति लिटरने पेट्रोल-डिझेल विकेन. सध्या महागाई वाढली आहे, ही महागाई कमी न झाल्यास भाजप सरकारला त्याचा चांगलाच तोटा होईल.' असे विधान रामदेवबाबांनी एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना केले.

2019 च्या निवडणूकीपूर्वीच पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा असा सल्लाही मी मोदी सरकारला दिला आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

रामदेवबाबांनी दोन दिवसांपूर्वीच महागाईवरून व रूपयाने निच्चांक गाठल्याने, मोदी सरकारवर टीका केली होती.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live