आता 'डॉन' च्या भूमिकेत शाहरुखऐवजी रणबीर दिसणार...  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

मुंबई : शाहरुख खान आणि रणबीर कपूर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघांच्याही नव्या चित्रपटांविषयी चर्चा सुरू झाली आहे. 

'झिरो' हा शाहरुख खानचा महत्त्वाकांक्षी चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर फारसा चालला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये शाहरुखचे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकलेले नाहीत. 'झिरो'च्या अपयशानंतर शाहरुखने काळजीपूर्वक चित्रपट निवडण्यास सुरवात केली आहे.

आता तो राजकुमार हिरानी यांच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा आहे. राजकुमार हिरानी यांनी यापूर्वी 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई', 'थ्री इडियट्‌स', 'पीके', 'संजू' या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 

दुसरीकडे, रणबीर कपूर आता फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. दीर्घ कालावधीनंतर फरहान अख्तर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. 'डॉन'च्या मालिकेतील पुढच्या 'डॉन 3' या चित्रपटासाठी फरहानने रणबीरकडे विचारणा केली आहे. यापूर्वीच्या 'डॉन' आणि 'डॉन 2' या चित्रपटांमध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. सध्या रणबीर कपूर त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. 

WebTitle : marathi news ranbir kapoor to play role of don instade of sharukh khan 

संबंधित बातम्या

Saam TV Live