रंगीला गर्लची काँग्रेसमधली 'दौड' थांबली; पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेससोबत 'जुदाई'

सुमित सावंत साम टिव्ही मुंबई
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

लोकसभा निवडणुकीपूर्वी गाजावाजा करत काँग्रेसवाशी झालेल्या उर्मिलानं पक्षाला सोडचिठ्ठी दिलाय. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं तिनं म्हटलंय. राजीनामा देतांना उर्मिलानं काँग्रेस नेतृत्वाला दोषी ठरवलंय.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलींद देवरा यांना मी १६ मे रोजी पाठवलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, या पत्रातील गोपनीय माहिती नंतर सोयीस्करपणे माध्यमांना पुरवण्यात आली.  या पत्रात ज्यांची नावं होती त्या उत्तर मुंबईतील काही जणांना त्यांच्या निवडणुकीतल्या वाईट कामगिरीबाबत जाब विचारण्याऐवजी चांगली पदं देण्यात आली. उर्मिला मातोंडकरनं केलेले हे आरोप काँग्रेसनं मात्र फेटाळलेत.

उर्मिला मातोंडकरनं भाजपच्या गोपाल शेट्टींविरोधात उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांचा  दारुण पराभव झाला होता. त्यानंतरही उर्मिला काँग्रेसमध्ये सक्रीय होती. मात्र आता काँग्रेसच्या गटा-तटाच्या राजकारणाला कंटाळून तिनं राजीनामा दिलाय. मुंबई काँग्रेसमध्ये गटा-तटाचं राजकारण तसं नवं नाही मात्र त्याचा आता उर्मिलालाही फटका बसलाय. प्यार तुने क्या किया है असं म्हणणाऱ्या उर्मिलावर आता काँग्रेस तुने ये क्या किया असं म्हणण्याची वेळ आलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live