'मर्दानी 2' साठी अभिनेत्री राणी मुखर्जी सहन करतेय चटके

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मे 2019

अभिनेत्री राणी मुखर्जीचा अभिनय नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरला आहे. बरीच वर्ष ती चित्रपटसृष्टीपासून दूर होती, पण गेल्या काही वर्षात ती बॉलिवूडमध्ये परतली, तेही 'मर्दानी' सारखा मजबूत विषय घेऊन. त्यानंतर तिने 'हिचकी' चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली. आता ती पुन्हा एकदा 'मर्दानी 2' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त झाली आहे. पण या चित्रपटाच्या शूटींगसाठी राणी सध्या ऊन्हाचे चटके सहन करत आहे. 

कुठलेही शूटींग करताना विशेषतः आऊटडोअर शूटींग करताना कलाकार स्वत:ची खूप काळजी घेतात. पण काही वेळा इलाजच नसतो. तरीही कुठलीच तक्रार न करता कलाकार जोमानं शूट करत असतात. अभिनेत्री राणी मुखर्जीही याला अपवाद नाही. सध्या ती राजस्थानमध्ये आपल्या आगामी 'मर्दानी 2' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. तिथे तापमान जवळपास 43 डिग्री सेल्सियस आहे. एवढ्या प्रखर ऊन्हात शूटिंग करताना सगळ्यांचीच दमछाक होते. पण, तरी ती कंटाळत नाही. एक दृश्य ती दोन ते तीन वेळा चित्रित करण्याची तिची तयारी असते. तिची मेहनत पाहून सगळेच चकीत झाले आहेत.

Web Title: marathi news rani mukherjee mardaani two hindi movies 

संबंधित बातम्या

Saam TV Live