लग्नासाठी रणवीर-दीपिका लग्नासाठी इटलीला रवाना

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

मुंबई- बॉलिवूडमधील बहुचर्चित रणवीर आणि दीपिकाचे लग्न 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यानिमित्त अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लग्नसोहळ्यासाठी इटलीला रवाना झाले आहेत. त्यांचे विमानतळावरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विमानतळावर रणवीर- दीपिकाला पाहण्यासाठी चाहत्यांचा गराडा होता. यावेळी रणवीरने काही चाहत्यांसोबत सेल्फी काढत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

काही दिवसांपूर्वी त्यांनी लग्नाची सोशल मिडीयावरून अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांनी लग्नाआधीचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम पार पाडले. 14 आणि 15 नोव्हेंबरला दोघे पारंपारिक कोकणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. दीपिका कर्नाटकातील सारस्वत ब्राह्मण असून कोकणी तिची मातृभाषा आहे.

इटलीतील लेक कोमो या ठिकाणी हा भव्य विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये आणि 1 डिसेंबर रोजी मुंबईत स्वागतसमारंभाचं आयोजन करण्यात येईल. इटलीत विवाहसोहळ्याला कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित राहणार असल्याने मुंबईतील स्वागत समारंभासाठी बाकी सर्वजण उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लग्नानंतर रणवीर त्याच्या येणाऱ्या सिंबा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणार आहे, या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान हिने काम केले आहे. रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात रणवीर पोलिसाच्या भूमीकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live