ठाकरेंनी दानवेंना दाखवली जागा; दानवेंना 'मातोश्री'ची दारे बंद ! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 जून 2018

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे बंद केल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. उद्धव यांच्या नाराजीमुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे फक्‍त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बरोबर घेवून उद्धव भेटीसाठी गेले आहेत. 

प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवे अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात बरोबर आहेत. सायंकाळी शाह सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर आमदार आशिष शेलार यांच्या घरी गेले. तिथून ते मातोश्रीकडे गेले, मात्र जाताना त्यांनी फक्‍त फडणवीसांना बरोबर घेतले. प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवे बरोबर असणे आवश्‍यक होते, मात्र उद्धव ठाकरेंनी दानवेंना बरोबर आणू नका, असा संदेश दिल्याने शाह यांनी त्यांना नेणे टाळले. हा प्रकार भाजपसाठी चपराक असल्याचे मानले जात आहे. 

दानवे हे शिवसेनेविरोधात आक्रमक असतात, तसेच ते वादग्रस्त वक्‍तव्ये करत असल्याने सेनेत त्यांच्याविषयी नाराजी आहेत. त्यामुळे त्यांना जागा दाखवावी, म्हणून त्यांना मातोश्रीची दारे बंद केल्याचे मानले जात आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live