Ravsaheb Danve म्हणतात, "जातिवादी म्हणणारेच आमच्या पंगतीत जेवून गेले"

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद - आम्हाला जातिवादी म्हणणारे सर्व आमच्या पंगतीत एकदा जेवून गेले. शरद पवार, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आधी आमच्यासोबत होते. आता त्यांना आम्हाला जातिवादी म्हणण्याचा अधिकार नाही, असे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडारा व दादर लोकसभेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला. आता त्यांच्या अनुयायांना मत मागण्याचा अधिकार काँग्रेसला आहे का? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.

शिवसेना, भाजपने लोकसभेसाठी एकत्र यावे. २०१९ ची मॅच आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. शहरातील जबिंदा लॉन्सवर रविवारी (ता. दहा) सायंकाळी झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. 

भाजपने मला शिवसेनेच्या कोट्यातील दक्षिण मुंबईतून निवडून आणावे, असेही श्री. आठवले म्हणाले. या मेळाव्याला उद्‌घाटक म्हणून, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. वंचित समाजाला न्याय हवा असेल तर त्यांनी माझ्यासोबत यावे, असे म्हणत श्री. आठवले यांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता टीका केली. ऐक्याची हाक देणाऱ्यांनी ऐक्याला विरोध करणाऱ्या नेत्यांना जिल्हाबंदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी भागवत कराड, आमदार अतुल सावे, उपमहापौर विजय औताडे यांची उपस्थिती होती. तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट आदींनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. मंचावर महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे, जित आठवले, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, जालिंदर शेंडगे, बाळकृष्ण इंगळे, किशोर थोरात, संजय ठोकळ, नागराज गायकवाड, विजय मगरे, कमलेश चांदणे यांची उपस्थिती होती. महिला आघाडीच्या अध्यक्ष सीमा आठवले, कांतीकुमार जैन, माजी आमदार अनिल गोंडाणे, ब्रह्मानंद चव्हाण, दौलत खरात, धम्मानंद मुंढे, गौतम सोनवणे, चंद्रकांत चिकटे, मिलिंद शेळके, पप्पू कागदे, श्रावण गायकवाड आदींची मेळाव्यात भाषणे झाली. 

WebTitle: marathi news raosaheb danve on sharad pawar chandrababu naidu and mamata banerjee 

संबंधित बातम्या

Saam TV Live