आता बनवा सरकार म्हणत दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोला

सरकारनामा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

भोकरदनः केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत असतात. आता त्यांच्या निशाण्यावर आहेत उद्धव ठाकरे..

सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी वेळ दिला नाही, म्हणून न्यायालयात धाव घेणाऱ्या मित्रपक्ष शिवसेनेला भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे. " तुम्हाल वेळ हवा होता, आता राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेणे योग्य नाही'' अशा शब्दांत दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना शिवसेनेला डिवचले.

मित्रपक्ष शिवसेनेने जनादेशाचा आदर केला नाही, आता राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी भरपूर वेळ दिला आहे, त्याचा सदुपयोग करून घेत त्यांनी सरकार स्थापन करावे असे आवाहन देखील रावसाहेब दानवे यांनी केले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपाल व केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकावर चोहोबाजूंनी टिकेची झोड उठत आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यात विशेषता मराठवाड्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला असतांना राज्यात सरकार स्थापन होऊन त्याला तात्काळ मदत होणे गरजेचे होते. पण मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या हट्टामुळे राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकले नाही.

महायुती म्हणून राज्यातील जनतेने आम्हाला कौल दिला होता, त्यामुळे लवकर सरकार स्थापन करून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताची कामे करणे अपेक्षित होते. पण शिवसेनेने सुरूवातीपासूनच आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. मित्रपक्ष सोबत नसल्याने भाजपकडे सरकार स्थापन करण्याएवढे पुरेसे संख्याबळ नसल्याने आम्ही सत्तेचा दावा करू शकलो नाही. शिवसेनेला राज्यपालांनी आमंत्रित केले, पण त्यांनाही सरकार स्थापन करता आले नाही.

राज्यपालांनी भाजपलाही वेळ वाढवून दिली नाही

शिवसेनेने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतांना केवळ आमदारांच्या नावांची यादी दिली, आणि वेळ वाढवून मागितली. राज्यपालांनी त्यास नकार दिला, खरतंर भाजपने देखील राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितली होती, पण त्यांनी आम्हालाही ती वाढवून दिली नसल्याचा खुलासाही रावसाहेब दानवे यांनी यावेळी केला.

कुठलाच पक्ष सत्ता स्थापन करू शकत नसल्यानेच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्राकडे केली. शिवसेनेला वेळ हवा होता, आता सहा महिने वेळच वेळ आहे, तेव्हा आवश्‍यक आमदारांचे समर्थन मिळवून त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि राज्यातील जनतेला या परिस्थितीतून सोडवावे असे आवाहन करतांनाच आम्ही विरोधी पक्षात बसू असेही स्पष्ट केले.  

Web Title - raosaheb danve statement on uddhav thakarey 

संबंधित बातम्या

Saam TV Live