बलात्काराचा सर्वात सुपरफास्ट निकाल; अवघ्या सहा तासांत सुनावली बलात्कार करणाऱ्या आरोपीला शिक्षा  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

जिल्ह्यामध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर 14 वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना घडली अन् अवघ्या सहा तासांमध्ये न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. अगदी कमी वेळेमध्ये न्याय मिळाल्याची ऐतिहासीक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी 15 ऑगस्ट रोजी मुलीला शेजारच्या 14 वर्षीय मुलासोबत खेळण्यासाठी पाठवले होते. मुलीचे कुटंबिय कामासाठी बाहेर गेल्यानंतर मुलाने बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपी गाव सोडून पळून गेला होता. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्याला दुसरय़ाच दिवशी एका नातेवाईकाच्या घरातून पकडण्यात आले.

पोलिसांनी चार दिवसांच्या आत तपास पूर्ण केला. सोमवारी (ता. 20) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायाधीश तृप्ती पांडे यांनी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासातंच निर्णय दिला. दोषी अल्पवयीन असल्याने त्या आरोपीची दोन वर्षांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयानेही त्याचदिवशी शिक्षेचीही सुनावणी केली. देशातील हा बलात्काराचा सर्वात सुपरफास्ट निकाल असल्याचे म्हटले जात आहे.

या प्रकरणातही तातडीने शिक्षा
8 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील दतिया येथील एका न्यायालयानेही चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्याला, 3 दिवसांच्या सुनावणीनंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
छतरपूर जिल्ह्यातही स्थानिक न्यायालयाने दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती, ही सुनावणी 27 दिवस चालली होती.
8 जुलैला मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात 46 दिवसांच्या सुनावणीनंतर बलात्काऱ्याला शिक्षा सुनावण्यात आली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live