SHOCKING | तिच्या बलात्काराचा व्हिडीओ 80 लाख लोकांकडून पॉर्न साईटवर सर्च...

मोहिनी सोनार
बुधवार, 4 डिसेंबर 2019

हैदराबादमध्ये 26 वर्षीय डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आलं. हे कमी होतं की काय आता आणखी एक धक्कादायक बाब तिच्याबाबतीत समोर येतेय. लोकांची मानसिकता इतक्या खालच्या पातळीची कशी असू शकते हा प्रश्न पडतो. मात्र याबाबत कुठे तरी विचार करण्याची गरज आहे.

बलात्कार आणि हत्या ही घटनाच एखाद्या माणसाला पूर्णपणे हादरवून सोडणारी आहे. देशात त्याहूनही नीच आणि घृणास्पद गोष्ट समोर आलीय. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची साईट असणाऱ्या एका पॉर्न साईटवर तिचं नाव पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होतंय. 

हैदराबादमध्ये 26 वर्षीय डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आलं. हे कमी होतं की काय आता आणखी एक धक्कादायक बाब तिच्याबाबतीत समोर येतेय. लोकांची मानसिकता इतक्या खालच्या पातळीची कशी असू शकते हा प्रश्न पडतो. मात्र याबाबत कुठे तरी विचार करण्याची गरज आहे.

बलात्कार आणि हत्या ही घटनाच एखाद्या माणसाला पूर्णपणे हादरवून सोडणारी आहे. देशात त्याहूनही नीच आणि घृणास्पद गोष्ट समोर आलीय. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची साईट असणाऱ्या एका पॉर्न साईटवर तिचं नाव पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होतंय. 

फक्त पॉर्न साईटवरच नाही तर गुगल सर्चमध्ये सुद्धा Pri***** ***** Rape Video आणि Pri***** ***** Porn हे दोन शब्द सर्वाधिक सर्च केले गेले होते. यामध्ये देशातील सर्वाधिक स्रच हे पश्चिम बंगाल राज्यातून केलं गेलं होतं. त्यापाठोपाठ तेलंगणाचाही क्रमांक येतो. 

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात
राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://bit.ly/384UeFJ

तब्बल 80 लाख लोकांनी या एका पॉर्न साईटवर तिचा बलात्काराचा व्हिडिओ सर्च केला आहे. ही पॉर्न साईट भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे व्हर्जन आहे.  ही पॉर्न साईट जगातील सर्वांत जास्त पाहिल्या जाणाऱ्या पॉर्न साईट्सपैकी एक आहे. आणि अशा प्रकारे घृणास्पद माहिती समोर आल्यानं पॉर्न साईट आणि गुगलवर सर्च करुन तिचं हसू केलंय. अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना कठोर शिक्षा होणं  अत्यंत गरजेचं आहे. 

बलात्कार प्रकरणातील आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली देऊनही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची अजून कारवाई झालेली नाही. त्यामुळे तीव्र संतापाच्या भावना नागरिकांमधून उमटतायेत. मात्र अशातच या प्रकारे त्या दुर्दैवी बल्त्कार पिडीतेचं लोकांनी अशा प्रकारे हसू केलंय. एकीकडे तिला न्याय मिळण्यासाठी भांडायचं आणि दुसरीकडे इतकं नीच कृत्य करायचं. तिच्यावर बलात्कार झाल्यावर तिची अखेरी झुंज,  कशा प्रकारे प्रकारे तिनं विरोध केला असेल त्या किंचाळ्या ऐकण्यासाठी लोकांनी तिच्या बलात्काराचा व्हिडिओ पॉर्न साईट आणि गुगलवर सर्च करुन तिचा घोर अपमान केलाय. आपल्या समाजावर आणि माणसांच्या वृत्तीवर आता चिड नाही तर कीव येते. तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांसह ती 80 लाख लोकं ज्यांनी तिच्या बलात्काराचा व्हिडिओ त्या पॉर्न साईटवर सर्च केला ते सुद्धा तिचे आणि आपल्या समाजाचे बलात्कारीच आहेत. कारण आजपर्यंत समाजात अशा कित्येक घटना घडून गेल्यात. आणि या प्रकारामुळे तर खरोखर या लोकांच्या मानसिकतेवर किव येते. 

 

 

Image may contain: text

 

No photo description available.

 

दरम्यान तिच्या नावाचा टॅग या पॉर्न साईटवरुन काढून टाकण्यात यावा यासाठी change.org वर एक मोहिम सुरु करण्यात आल्याची माहिती आहे. यावर साईटवर जाऊन तुम्हीसुद्धा पिटीशन दाखल करुन या मोहिमेत सहभागी होऊ शकता. निदान त्या 80 लाखांपैकी या क्रुर कृत्याबाबत कोणाची भावना काय आहे हे तरी कळेल.

Web Title -  rape case victim was searched 8 million times on porn site

 

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!
 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live