...तर बलात्कार पीडितेविरोधातच चालणार खटला

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

बलात्काराच्या खटल्यात पीडितेने ऐनवेळी आरोपीला वाचवण्यासाठी आपली साक्ष बदलण्याचा प्रयत्न केला तर पीडितेविरोधातच खटला चालवला जाऊ शकतो, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

एका प्रकरणात आरोपीला 10 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत बलात्कारच झाला  नसल्याचं सांगत कोर्टात साक्ष बदलली होती. या घटनेचा संदर्भ घेत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रंजन गोगोई, नवीन सिन्हा आणि के.एम.जोसेफ यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे.

'बलात्कार पीडितेकडून वैद्यकीय अहवाला व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणास्तव क्लीन चीट देण्याचा किंवा साक्ष बदलण्याचा प्रयत्न केला गेला. तर, पीडितेविरोधातच खटला दाखल केला जाऊ शकतो', असं गोगोईंच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live