कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांची भारतात झपाट्याने वाढ, अमेरिकेलाही मागे टाकण्याची शक्यता

साम टीव्ही
शनिवार, 13 जून 2020
  • कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांची भारतात झपाट्याने वाढ
  • कोरोनाग्रस्तांच्या वृद्धीदरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर
  • भारतात अवघ्या 17 दिवसांत कोरोनाचे दुप्पट रुग्ण
  • भारत अमेरिकेलाही मागे टाकण्याची शक्यता

भारताची चिंता वाढवणारी बातमी. कोरोनाग्रस्तांचा आकडा भारतात झापाट्याने वाढत असल्याचं समोर आलंय. हा आकडा इतक्या वेगाने वाढतोय की, काही महिन्यांत भारत अमेरिकेलाही मागे टाकेल अशी शक्यता निर्माण झालीय... जागतिक आरोग्य संघटनेनं तशी आकडेवारी जाहीर केलीय. 

जगातिल सर्वाधिक संक्रमितांच्या यादीत भारताने एका दिवसात इंग्लंड आणि स्पेनला मागे टाकलेलं असतानाच, आता कोरोनाग्रस्तांच्या वृद्धीदरात इतर देशांच्या तुलनेत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय. याचाच अर्थ असा की, भारतात कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा वेग जगातील इतर देशांपेक्षा जास्त आहे. अशी धक्कादायक आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलीय.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा दर जगात सर्वाधिक म्हणजेच 4.30 टक्के आहे, तर कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा दर 4.26 असलेल्या ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. 

1.70 तिसऱ्या क्रमांकावर रशिया पोहोचलीय. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा दर 1 टक्के आहे. कोरोनाग्रस्त वाढीच्या दराबाबत भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला असतानाच, कोरोनाग्रस्तांच्या डबलिंग रेटबाबतही भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live