रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक; अमृता फडणवीसांकडून अभिनंदन, तर राऊत नाराज?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 मार्च 2020

मुंबई : सामना या शिवसेनेच्या मुख्यपत्राच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळं सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा आहे. या संदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. या नाराजी संदर्भात संजय राऊत यांना विचारले असता, त्यांनी माझं काम भक्त प्रल्हादासारखं असल्याची प्रतिक्रिया दिलीय.

मुंबई : सामना या शिवसेनेच्या मुख्यपत्राच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळं सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा आहे. या संदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. या नाराजी संदर्भात संजय राऊत यांना विचारले असता, त्यांनी माझं काम भक्त प्रल्हादासारखं असल्याची प्रतिक्रिया दिलीय.

राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होण्यात सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यात त्यांनी महत्त्वाचं काम केलं होतं. सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत यांचे बंधू, सुनील राऊत यांचा मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा संजय राऊत यांना होती. पण, सुनील राऊत यांना कोणतेही मंत्रिपद मिळाले नाही. त्यावेळी संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्या चर्चेला तितक्याच वेगाने पूर्ण विराम मिळाला. आता राऊत हे सामनाच्या संपादक पदावरून नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरही खुद्द राऊत यांनी खुलासा करून, आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय. एबीपी माझानं या संदर्भात राऊत यांच्याशी संवाद साधला आहे.

रश्मी ठाकरे यांच्याकडे सामनाचं संपादक पद द्यायचा हा कौटुंबिक निर्णय आहे. आमच्या विश्वस्तांनी एकत्रित चर्चा करून घेतलेला निर्णय आहे. बाळासाहेबांनी मला कार्यकारी संपादक होण्याची संधी दिली. माझं काम भक्त प्रल्हादासारखं आहे.
- संजय राऊत, कार्यकारी संपादक, सामना 

 

अमृता फडणवीसांकडून शुभेच्छा
ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या, अमृता फडणवीस यांनी आज, मात्र ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचे अभिनंदन करून, जणू धक्काच दिला. रश्मी ठाकरे यांची संपादकपदी नियुक्ती झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, सामनाच्या संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल रश्मी ठाकरे यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्या देशात महिलांचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ते योग्य पद्धतीने मांडण्यासाठी मोठ्या पदांवर महिलांचीच नियुक्ती होण्याची गरज आहे.

Congratulations & best wishes to Smt #RashmiThackeray for being appointed as new Editor of #Saamana !Our country needs more women in top leadership positions to represent the issues of women & society & also have a platform to voice their opinions in matters of public importance!

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 1, 2020

 

Web Title: marathi news rashmi thackeray becomes samna's new editor, amruta fadnavis congratulated her but sanjay raut unhappy


संबंधित बातम्या

Saam TV Live