सौ. रश्मी ठाकरे आजपासून 'सामना'च्या संपादक

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 मार्च 2020

रश्मी ठाकरेंकडे आजपासून सामना या मुखपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी देण्यात आलीय. सामना वृत्तपत्र सुरु झाल्यानंतर सौ. रश्मी उद्धव ठाकरे या तिसऱ्या संपादक बनल्या आहेत. सामनाच्या प्रेसलाईन मध्ये संपादक म्हणून सौ. ठाकरे यांचे नाव आजपासून लावण्यात आले आहे.

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'चे संपादकपद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सामनाच्या प्रेसलाईनमध्येही सौ. ठाकेर यांचे नाव प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर 'सामना'चे संपादक पद ठेवण्यात अडचण येऊ शकेल, अशी शक्यता असल्याने संपादकपद बदलण्यात आले आहे. 

  हे ही वाचा - नाणारला होकार द्यावा यासाठी उद्धव ठाकरेंचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरुच
 

सामना वृत्तपत्र सुरु झाल्यानंतर सौ. रश्मी उद्धव ठाकरे या तिसऱ्या संपादक बनल्या आहेत. सामनाच्या प्रेसलाईन मध्ये संपादक म्हणून सौ. ठाकरे यांचे नाव आजपासून लावण्यात आले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे सामनाच्या कार्यकारी संपादकपदी कायम आहेत. २३ जानेवारी १९८९ रोजी शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी सामना हे मुखपत्र सुरु केले. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता पक्षाच्या मुखपत्राचे संपादक म्हणून राहणे त्यांना अडचणीचे ठरु शकते, हे लक्षात घेऊन, संपादक पदात बदल करण्यात आला आहे.

Web Title - marathi news rashmi thackeray is new editor of saamna from today


संबंधित बातम्या

Saam TV Live