चीन ड्रॅगनची आता खैर नाही, रशिया भारताला देणार ब्रम्हास्त्र

साम टीव्ही
सोमवार, 22 जून 2020
  • चीन ड्रॅगनची आता खैर नाही
  • रशिया भारताला देणार ब्रम्हास्त्र
  • संरक्षण मंत्री रशियाला रवाना 

रशियाच्या विक्ट्री डे परेडच्या निमित्ताने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. संरक्षण मंत्र्यांचा हा दौरा आपल्यासाठी का महत्वाचा आहे, पाहूयात एक रिपोर्ट

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनी ड्रॅगनला रोखण्यासाठी भारताने पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. चीनची आर्थिक कोंडी करतानाच स्वतः शस्त्रसज्ज होण्यावर भारताने भर दिलाय. त्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या रशियाचा दौऱ्याचं आयोजन केलंय.

रशियाकडून अँटी मिसाइल सिस्टम S-400 मिळवण्यासाठी 2018 साली भारताने 5 अब्ज डॉलरचा करार केलाय. आपल्या 400 किलोमीटरच्या परिघात येणारं प्रत्येक क्षेपणास्त्र आणि अद्ययावत विमान पाडण्याची या यंत्रणेची क्षमता आहे. तसंच ही यंत्रणा भारतीय लष्कराच्या ताफ्यात आल्यास अण्वस्त्रसज्ज बॅलिस्टिक मिसाईल्सपासूनही सुरक्षा मिळणार आहे. 
पण कोरोना संकटामुळे ही यंत्रणा मिळण्य़ास उशिर झालाय. आता डिसेंबर 2021 पर्यंत ही यंत्रणा भारतीय लष्कराच्या ताब्यात मिळेल. मात्र ती लवकरात लवकर मिळावी यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.
विशेष म्हणजे चीनने रशियाकडून ही यंत्रणा अगोदरच विकत घेतलीय. त्यामुळे संरक्षण मंत्र्यांचा रशिया दौरा अत्यंत महत्वाचा आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live