निवडणुकाचे निकाल पाहुन कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

निवडणुकाचे निकाल पाहुन कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लोकसभा निकाल 2019
मुंबई: मध्य प्रदेशातील 'सीहोर' मतमोजणी केंद्रावर कॉंग्रेसचे सीहोर जिल्हाध्यक्ष रतन सिंह ठाकुर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यृ झाला. ठाकुर हे 'सीहोर' मतमोजणी केंद्रवर गेले होते. मतमोजणी केंद्रातले निकाल पाहुन ते अचानक खुर्चीवर कोसळले. त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आहे, पण डॉक्टरने त्यांना मृत घोषीत केले.

दरम्यान, दरम्यान, महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दुपारी एकपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 346 जागांवर आघाडीवर होते; तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ 85 जागांवरच आघाडी मिळविता आली. यामुळे देशात पुन्हा एकदा मोदींचीच सत्ता येणार, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची जोडी रोखण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशभरातील विरोधकांनी प्रचंड प्रयत्न केले. पण या प्रयत्नांना काहीही यश आलेले दुपारी एकपर्यंतच्या आकडेवारीमध्ये दिसत नाही. या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर प्रदेशमध्ये मायावती-अखिलेश यादव यांनी परस्पर आघाडी करत कॉंग्रेसला धक्का दिला. त्यानंतर इतर राज्यांमध्येही कॉंग्रेसला आघाडीच्या पातळीवर फारसे यश मिळाले नाही. उमेदवार निवडतानाही कॉंग्रेसने अनेक ठिकाणी चालढकल केली. त्याचाही मोठा फटका पक्षाला बसल्याचे निकालामध्ये दिसत आहे.

Web Title: Ratansingh Thakur dies due to heart attack after seeing Loksabha 2019 results

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com