जैतापूर प्रकल्पाविरोधात आज जेलभरो आंदोलन; जेलभरोच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत चोख बंदोबस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधात आज जेलभरो आंदोलन पुकारण्यात आलंय. जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

दरम्यान, जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधात साखरीनाटे इथल्या ग्रामस्थांनी आजही आंदोलन सुरूच ठेवलंय. साखरीनाटे इथल्या मच्छिमारांच्या विरोधामुळे हे आंदोलन जिवंत आहे.

राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. कोणत्याही परिस्थितीत जैतापूर अणुउर्जा प्रकल्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेत जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय.

WebTitle : marathi news ratnagiri jailbharo agitation against jaitapur power plant 

संबंधित बातम्या

Saam TV Live