कातळचित्रांना हजारो पर्यटकांची भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 जून 2018

रत्नागिरी - उक्षी आणि देवाचे गोठणे येथील ग्रामस्थ कातळचित्राच्या माध्यमातून पर्यटन व गाव विकासासाठी एकत्र आले आहेत. गेल्या दोन महिन्यांत या दोन्ही ठिकाणी सुमारे सात हजार पर्यटकांनी भेट दिली. तसेच ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, युके, अमेरिका आदी विदेशी पर्यटकही येऊ लागले आहेत. या माध्यमातून त्यांना विकासाची नवी दिशा सापडली आहे.

शोधकर्ते सुधीर रिसबूड, डॉ. सुरेंद्र ठाकुर-देसाई आणि धनंजय मराठे यांनी आतापर्यंत 52 गावांतून 1000 पेक्षा जास्त कातळचित्रे शोधली आहेत. आतापर्यंत शोधकर्त्यांनी स्वखर्चाने काम केले. शासनावर अवलंबून न राहता उक्षी व देवाचे गोठणे ग्रामस्थांनी लोकसहभागातून चित्रे संरक्षित केली. अन्य गावांनीही त्यांचा आदर्श घ्यावा. शासनाच्या मदतीची गरज गावांना आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आँचल गोयल यांनी बारसू सडा व देवाचे गोठणे येथील चित्रांना भेट दिली आहे. चवे देवूड, उक्षी, निवळी, कोळंबे, (रत्नागिरी), कशेळी-गावखडी, रुंढे तळी, देवीहसोळ, बारसू, देवाचे गोठणे (ता. राजापूर) ही चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

कातळसड्यावर आडव्या स्वरूपात चित्रे

  • 8 बाय 8 मीटर आकाराच्या भौमितिक संरचना
  • भारतातील सर्वांत मोठी एक सलग, अतिभव्य रचना
  • चुंबकीय विस्थापनाचा चमत्कार जांभ्या कातळात एकमेव

संबंधित बातम्या

Saam TV Live