VIDEO। राहुल गांधींचा धमाल डान्स... पाहा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

रायपुर (छत्तीसगड) : काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात. आज देखील त्यांच्या एका व्हिडीओमुळे ते चर्चेत आले आहेत.

रायपुर (छत्तीसगड) : काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात. आज देखील त्यांच्या एका व्हिडीओमुळे ते चर्चेत आले आहेत.

दरम्यान, छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपुरमध्ये सध्या तीन दिवसीय राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव सुरु आहे. या महोत्सवास आज राहुल गांधी यांनी भेट दिली. यावेळी झालेल्य़ा कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आदिवासी नृत्य करत सर्वांची मने जिंकली. तसेच त्यांनी पारंपरिक आदिवासी वाद्य वाजविण्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांचा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वागत केले.

VIDEO | विश्वास नांगरे-पाटलांचा हा बाला डान्स एकदा बघाच!

यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना राहूल गांधी यांनी अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मोदी सरकार हे देशातील 'सर्वधर्म समभाव' या संकल्पनेला धक्का पोहचवत असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. सध्याच्या आर्थिक स्थितीवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.          

दरम्यान, या आदिवासी महोत्सवात 25 राज्यांमधील आदिवासी बांधव आपले कार्यक्रम सादर करणार आहेत. या महोत्सवात सहा देशांचे प्रतिनिधी व त्यांचे आदिवासी बांधव मंडळ सहभागी होणार आहे. आज रात्री थायलंड, बांग्लादेश, बेलारूस, मालदीव, युगांडा या देशांमधील कलाकार नृत्य सादर करणार आहेत.

Web Title: Rahul gandhi said that india economy can not run without taking people of all religions


संबंधित बातम्या

Saam TV Live