उर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट?

उर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट?

नवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. या भेटीत केंद्र सरकार आणि  रिझर्व्ह बँक यांच्यात ज्या मुद्द्यांवर वाद सुरु झाला होता त्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्जित पटेल यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींसोबतही चर्चा केल्याचे वृत्त आहे. बँकांचा वाढलेले एनपीए, आरबीआयने कर्ज वितरणावर घातलेले निर्बंध आणि आरबीआयची स्वायत्तता या मुद्यांवर मागील काही दिवसांपासून आरबीआयचे गव्हर्नर आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली होती. तसेच, गरज पडल्यास जनतेच्या हिताच्या कारणास्तव 'आरबीआय सेक्शन 7' नुसार आरबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार असल्याचे सांगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या शाब्दिक चकमकीला आणखीनच बळ दिले होते. त्यानंतर, उर्जित पटेल राजीनामा देणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे समजते.  आता येत्या 19 नोव्हेंबरला आरबीआयच्या संचालक मंडळाची नियोजित बैठक होणार आहे. 

WebTitle : marathi news RBI governer urjit patel met PM modi 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com