...म्हणून आता  गृहकर्ज महागणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गृहकर्ज महागणारंय. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ करून तो 6.50 टक्क्यांवर नेण्यात आलाय.

तर रिव्हर्स रेपो रेट 0.25 टक्क्यांची वाढ नोंदवून 6.25 टक्क्यांपर्यंत गेलाय. आर्थिक विकासाला गती देण्याचं कारण देत व्याजदरात वाढ करण्यात आली असून, ऊर्जित पटेल यांनी हे पतधोरण जाहीर केलं आहे.

आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांची कर्जे महागणार असून, याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. रिझर्व्ह बँकेनं याआधी 6 जूनला पतधोरण जाहीर केलं होतं 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live