रिझर्व्ह बँकेचा RTGS आणि NEFT बाबत मोठा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जून 2019

मुंबई : रिझर्व्ह बँकेने आता रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएस आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे एनईएफटीवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा फायदा ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 6 टक्क्यांवरून कमी होत 5.75 टक्क्यांवर आला आहे.रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने आता रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएस आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे एनईएफटीवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा फायदा ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 6 टक्क्यांवरून कमी होत 5.75 टक्क्यांवर आला आहे.रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे.

आरटीजीएस आणि एनईएफटीबद्दल अधिक माहिती जाणून घ्या

RTGS -आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) ही अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येऊ शकते. याद्वारे 2 लाख रुपये हस्तांतरित करता येऊ  शकतात.  ‘आरटीजीएस’ या प्रणालीच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रक्कम हस्तांतर करता येते. आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) पद्धत सर्वसाधारणपणे देशातील केंद्रीय बँकांकडून वापरली जाते. मोठे व्यवहार आरटीजीएसमार्फत सुरक्षितरीत्या केले जातात. आरटीजीएस ही एक आर्थिक व्यवहाराची अशी पद्धत आहे की त्यात एका बँकेतून दुसर्‍या बँकेत आर्थिक हस्तांतरण होता वास्तविक वेळेत व्यवहार होतात. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या वेळेतच अशा प्रकारचे व्यवहार पूर्ण होतात. 

- विशेष म्हणजे तुम्ही जर नेटबँकिंग करत असाल तर बँकेत न जाता आपण आपल्या घरच्या संगणकाद्वारे आरटीजीएस ऑप्शनमध्ये जाऊन ज्या व्यक्तीला तुम्हाला रक्कम द्यावयाची आहे त्या व्यक्तीचा खाते क्रमांक द्यावा, काही बँका कोड विचारणा करतात. तेव्हा हा कोड संबंधित बँकेकडून घ्यावा किंवा भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर संबंधित बँकेचा आयएफएस कोड मिळेल. 

NEFT - एनईएफटीमुळे देशभरात एका बँकेतून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरण करणे सुलभ व लवकर होते. एनईएफटी मध्ये देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते असलेल्या व्यक्तीला कोणत्याही बँकेच्या शाखेतून इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करता येतात.

एनईएफटी सुविधा 63,000 बँकांद्वारे संपूर्ण देशभर तसेच नेपाळला देखील पुरवली जाते. निधी ऑनलाईन हस्तांतरित करण्याची परवानगी देते. क्रेडिट कार्डवरील रकमेच्या पेमेंटसाठी देखील याचा वापर केला जातो.

एनईएफटीची निधी हस्तांतरित करण्याची वेळ ही आरटीजीएस प्रमाणे ठराविक वेळेत नसते. पण ही मुदत तासाच्या आधारावर प्रमाणित केली जाते. एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात हस्तांतरित केलेली रक्कम दोन तासांच्या आत लाभार्थीच्या खात्यात जमा केली जाते.

रोख रक्कम हस्तांतरित करताना कमाल मर्यादा 50,000 रु. प्रति व्यवहार आहे. तसेच ग्राहकांना वैयक्तिक सर्व माहिती पुरवणे आवश्यक आहे.
एका खात्यातून लाभार्थी (beneficiary) खात्यात पैसे पाठविण्यापासून ते निधी हस्तांतरित करण्यासाठी, तपशीलांसह फॉर्म (खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव, आयएफएससी कोड, हस्तांतरित रक्कम आणि खाते प्रकार) इत्यादी माहिती भरणे आवश्यक आहे. 

आरटीजीएसच्या वेळेत वाढ: 
रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देत रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएसच्या वेळेत वाढ केली आहे. आता आरटीजीएसच्या माध्यमातून संध्याकाळी उशिरापर्यंत पैसे पाठविता येणार आहे. आरटीजीएसच्या वेळेत दिड तासांची वाढ करण्यात येणार आहे. येत्या 1 जूनपासून वेळ वाढविण्यात आली आहे. 

सध्या आरटीजीएसमार्फत दुपारी साडेचारपर्यंत पैसे पाठविता येतात. रिझर्व्ह बँकेने निश्‍चित केलेल्या वेळेत आरटीजीएसचे व्यवहार केले जातात. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत आरटीजीएसमार्फत व्यवहार केले जातात. आता 1 जूनपासून संध्याकाळी 6 पर्यंत आरटीजीएस या प्रणालीच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रक्कम हस्तांतरीत करता येते. 

 

WebTitle : marathi news RBIs new rules and regulations related to RTGS and NEFT


संबंधित बातम्या

Saam TV Live