'बालभारतीची पुस्तकं फेकून द्या'; वीस दोन, सत्तर चार वरून भडकले शिक्षक आमदार   

'बालभारतीची पुस्तकं फेकून द्या'; वीस दोन, सत्तर चार वरून भडकले शिक्षक आमदार   

राज्यात सध्या बालभारतीच्या पुस्तकातील गोंधळाचा मुद्दा चांगलाच तापलाय. बालभारतीनं संख्यावाचनात नवी पद्धत आणल्यानं अनेक पालक संभ्रमात आहेत. या नव्या वाचनपद्धतीनुसार आता बत्तीसऐवजी तीस दोन, बहात्तरऐवजी सत्तर दोन असं म्हणावं लागणारंय. विधीमंडळाच्या अधिवेशनात बालभारतीच्या या गोंधळावर तीव्र पडसाद उमटले. लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणाच्या धोरणावरून घणाघाती टीका केलीय. 

बालभारतीची संख्यावाचनाची ही नवी पद्धत म्हणजे शिक्षणाचा विनोद झाल्याची टीका कपिल पाटील यांनी केलीय. बालभारतीची नवी पुस्तकं फेकून द्या. अशा शब्दात पाटील यांनी आपला संताप व्यक्त केलाय. 

बालभारतीनं दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मराठी जोडाक्षरं कठीण असल्याचा हवाला देत बालभारतीनं या नव्या पद्धतीची अंमलबजावणी केलीय. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असून, पालकही संभ्रमात पडले आहेत. अशी नवी पद्धत आणून शिक्षणविभाग मराठीची गळचेपी तर करत नाही ना असा सवालही पालक आणि तज्ज्ञ मंडळीकडून होवू लागलाय.

WebTitle :marathi news reaction after changes made in second standard math book 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com