यापूर्वीही चौकशीला सहकार्य करत होतो आणि पुढेही करत राहीन - अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

मुंबई : सिंचन गैरव्यवहार प्रकरणात एसबीने शपथपत्रात माझे घेतले असले तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यापूर्वीही चौकशीला सहकार्य करत होतो आणि पुढेही करत राहीन, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

विदर्भातील बहुचर्चित सिंचन गैरव्यवहाराला माजी उपमुख्यमंत्री; तसेच तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार जबाबदार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या शपथपत्रात म्हटले आहे. एसीबीने हे शपथपत्र मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. याविषयी अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार म्हणाले, की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. नागपूर उच्च न्यायालयात हे प्रकरण असल्याने मला त्याबद्ददल अधिक काही बोलता येणार नाही. माझ्या वक्तव्यामुळे यात कोणतीही बाधा येऊ नये. मी माझे काम करतोय आणि सरकार सरकारचे काम करत आहे.

WebTitle : marathi news reaction of ex cm ajit pawar after ACB files affidavit in irrigation scam 

संबंधित बातम्या

Saam TV Live