वाचा, रशिय़ाची लस भारतात कधी येणार?

साम टीव्ही
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

 

  • रशिय़ाची लस भारतात कधी येणार?
  • रशियाकडून लस खरेदी करणार भारत ?
  • भारताला रशियाची लस मिळणार की नाही ?

रशियानं कोरोनावर लस शोधून काढल्याचा दावा केलाय. त्यामुळे ही लस भारतात कधी येणार?याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलीय. पाहुयात कसा असेल या लसीचा प्रवास

रशियानं कोरोना प्रतिबंधात्मक लस शोधल्याचा दावा केला आणि साऱ्या जगाच्या आशा पल्लवित झाल्या. ही लस भारतात कधी येणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागलीय. जर ही लस 2 निकषांवर यशस्वी ठरली तरच भारत या लसीची आयात करेल असं एम्सचे डायरेक्टर गणदीप गुलेरीया यांनी म्हटलंय.

  • रशियन लस जर सुरक्षित आणि प्रभावी ठरली तरच भारत ही लस आयात करेल
  • सुरक्षित म्हणजे लसीचा रुग्णांवर कोणताही साईड-इफेक्ट होणार नाही
  • प्रभावी म्हणजे लसीमुळे प्रतिकारशक्ती वाढेल

सुरक्षितता आणि प्रभावीपणा दोन निकषांवर लस यशस्वी ठरली तर भारत या लसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर भारतातच सुरु करण्यासाठी सक्षम आहे

खरं तर या लसीच्या सुरक्षेवरनंअमेरिका, जर्मनीसह जागतिक आरोग्य संघटनेनंही संशय व्यक्त केलाय. रशियानं या लसीसंबंधी पूर्ण माहिती दिली नसल्याचा आरोप होतोय. पुतिननं मुलीला लस टोचली ही या लसीची एक प्रकारची मार्केटींग असल्याचा आरोप अनेक देश करतायंत.

दुसरीकडे या लसीचे 30 कोटी डोस बनवण्याची प्रक्रिया रशियानं सुरु केलीय. अर्थात सुरक्षा आणि प्रभावीपणा या दोन निकषांवर ही लस यशस्वी ठरली तरच भारतात ही लस येईल, असं एम्सचं म्हणणं आहे. त्यामुळे रशियन लस सध्या तरी भारतीयांसाठी एक मृगजळच म्हणावं लागेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live