श्रीदेवी यांचा मृत्यू बाथ टबमध्ये बुडून ?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मुंबई : श्रीदेवीच्या अकाळी जाण्याने तिच्या मृत्युविषयी अनेक तर्क बांधले गेले. श्रीदेवीच्या मृत्यूबाबत एक खळबळजनक माहिती समोर आलीय. श्रीदेवीचा बाथ टबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल स्थानिक हॉस्पिटलनं दिलाय. गल्फ न्यूजच्या हवाल्यानं ही माहिती समोर आलीय. श्रीदेवीच्या रक्तात अल्कहोलचा अंशही सापडलाय. त्यामुळं मृत्यूपूर्वी श्रीदेवीनं मद्यसेवन केलं होतं असा अंदाज लावला जातोय.

चंदेरी दुनियेत गेली अनेक दशके लुकलुकणारी "चाँदनी" म्हणजेच श्रीदेवी 54 व्या वर्षी अचानक लुप्त पावल्याने तिच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एका लग्नसमारंभास दुबई येथे गेल्या असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

श्रीदेवी यांच्या निधनाला 24 तासांहून अधिक काळ झाला आहे. त्यांचे पार्थिव दुबईहून भारतात अजूनही आणले गेले नाही. रविवारी सकाळी त्यांच्या निधनाबद्दल समजताच बॉलीवूडमधील दिग्गजांसह चाहत्यांनीही श्रीदेवी यांच्या घराबाहेर गर्दी केली. दुबईतील कायदेशीर प्रक्रियेमुळे श्रीदेवी यांचे पार्थिव कुटुंबियांना मिळण्यास उशीर होत असल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live