'या' कारणासाठी आशुतोष गोवारीकर यांनी केला ए.आर.रहमान यांना फोन

प्रेरणा जंगम
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

'लगान', 'स्वदेस', 'जोधा अकबर' यांसारख्या गाजलेल्या आणि इतर बऱ्याच चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन करणारे आशुतोष गोवारीकर तब्बल तीन वर्षांनी परतले आहेत.  मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या अशा पानिपतच्या युद्धाची कथा ते 'पानिपत' या चित्रपटातून घेऊन येत आहेत. याच चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा सगळीकडे होत आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट हे मुख्य आकर्षण ठरतयं. अर्जून कपूर, क्रिती सनोन, संजय दत्त चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

'लगान', 'स्वदेस', 'जोधा अकबर' यांसारख्या गाजलेल्या आणि इतर बऱ्याच चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन करणारे आशुतोष गोवारीकर तब्बल तीन वर्षांनी परतले आहेत.  मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या अशा पानिपतच्या युद्धाची कथा ते 'पानिपत' या चित्रपटातून घेऊन येत आहेत. याच चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा सगळीकडे होत आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट हे मुख्य आकर्षण ठरतयं. अर्जून कपूर, क्रिती सनोन, संजय दत्त चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. अर्जून कपूर या चित्रपटात सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत आहे, क्रिती सनोन ही सदाशिवराव भाऊ यांची पत्नि पार्वती बाई साकारत आहे, आणि संजय दत्त या चित्रपटात अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाच्या निमित्ताने अर्जून कपूर आणि क्रिती सनोन पहिल्यांदाच मराठमोळ्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. 

Image may contain: 7 people, people smiling, people standing

प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल  यांनी या चित्रपटाला संगीत दिलयं. मात्र गोवारीकरांच्या बऱ्याच चित्रपटांसाठी आत्तापर्यंत म्युझिक लेजंट ए.आर.ऱहमान यांनी संगीत दिलयं. 'लगान', 'स्वदेस', 'जोधा अकबर', 'मोहोंजोदारो' हे आशुतोष गोवारीकरांचे महत्त्वाचे चित्रपट रहमान यांच्याच संगीताने सजले होते. मात्र 'पानिपत'च्या संगीतासाठी गोवारीकरांनी अजय-अतुल यांची निवड केली.

'पानिपत'च्या ट्रेलरच्या अनौपचारिक कार्यक्रमात बोलत असताना गोवारीकरांनी याविषयीची एक महत्त्वाची गोष्ट शेयर केली.  गोवारीकरांनी 'पानिपत' चित्रपटादरम्यान  ए.आर.रहमान यांना फोन केला. या चित्रपटासाठी रहमान यांची निवड न करता अजय-अतुल यांची निवड करत आहोत असे गोवारीकरांनी रहमान यांना फोन करुन सांगीतले. दोन दिग्गज कलाकारांचा एकमेकांवर असणारा विश्वास, कलेची जाण आणि एकमेकांविषयी असलेला आदर याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. 

मराठी चित्रपट संगीतावर आणि आता हिंदी चित्रपट संगीतावरही अजय-अतुल यांचा जबरदस्त पगडा आहे. आणि म्हणूनच मराठ्यांच्या इतिहासावर आधारित या चित्रपटाला अजय-अतुल यांचं संगीत असावं अशी गोवारीकर यांची इच्छा होती. 

'पानिपत' हा  चित्रपट येत्या 6 डिेसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. गोवारीकर यांच्या मोहोंजोदारोच्या अपयशानंतर पानिपतला यश मिळेल की नाही हे प्रदर्शनानंतर समोर येईलच.

WebTitle : for this reason ashutosh gowarikar called A R Rahman 


संबंधित बातम्या

Saam TV Live