बरा झालेला कोरोना पुन्हा होतोय? अनेक संशोधकांच्या दाव्यांने खळबळ

साम टीव्ही
सोमवार, 27 जुलै 2020
  • बरा झालेला कोरोना पुन्हा होतोय?
  • काही महिन्यांतच अँटिबॉडीज होतायत नष्ट?
  • अनेक संशोधकांच्या दाव्यांने खळबळ

आता एक धक्कादायक बातमी. कोरोना आजार बरा झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होत असल्याने पुन्हा कोरोना होत नाही, असा निर्वाळा आधी देण्यात आला होता. मात्र आता पुन्हा कोरोना होऊ शकतो असा धक्कादायक निष्कर्ष संशोधकांनी काढलाय.

कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत असतानाच कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचं प्रमाणही वाढतंय. महत्त्वाचं म्हणजे एकदा बरा झालेला कोरोना पुन्हा होत नसल्याचा निर्वाळाही देण्यात आला होता, मात्र एका संशोधनातून आता धक्कादायक माहिती समोर आलीय. कोरोना बरा झाल्यानंतर शरीरात ज्या अँटिबॉडीज निर्माण होतात, त्या काही महिन्यांतच नष्ट होऊ शकतात. त्यामुळे बरा झालेला कोरोना पुन्हा होऊ शकतो अशी भीती या संशोधकांनी व्यक्त केलीय.

कोरोना पुन्हा होतोय?

संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णात अँटिबॉडीज निर्माण होतात. याच अँटिबॉडीज कोरोना विषाणूशी लढण्यास सक्षम असतात. मात्र निर्माण झालेल्या अँटिबॉडीज 73 दिवसांत अर्ध्या होत असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे बरा झालेला कोरोना पुन्हा होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली गेलीय.

कोरोनातून बऱ्या शरीरातून अँटिबॉडीज नष्ट होत असल्या तरी पेशीकांमध्ये एकप्रकारची स्मृती सक्षमता असते, त्याद्वारे अँटिबॉडीज निर्माण होऊ शकतात का, यावर संशोधन गरजेचं असल्याचं संशोधकांनी म्हटलंय. असं असलं तरी, कोरोना होऊच नये यासाठी नियमांचं पालन करत योग्य ती काळजी घेणं आपल्याच हातात आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live