बारामतीतील परप्रांतीय कामगारांनी स्थलांतर केले नाही, कारण...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

बारामती एम. आय. डी. सीतील "व्हेरिटास इंजिनिअरिंग या कंपनीत काम करणाऱ्या तब्बल दोनशे परप्रांतीय कामगारांची कंपनी व्यवस्थापनाने अन्न , धान्यसह किराणा माल देवून सेवा पुरविली आहे. त्यामुळे या कामगारांची लॉकडाऊनच्या काळातील भटंकतीसह , उपासमार व स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे.

उंडवडी :'कोरोना' आजार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यानंतर मुंबई, पुणे सारख्या शहारातील कंपन्या व कारखान्यातील परप्रांतीय कामगारांनी मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे कुटूंबासमवेत स्थलांतर केल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळाले. मात्र याला बारामतीतील "व्हेरीटास इंजिनिअरिंग कंपनी" अपवाद ठरली आहे. 

बारामती एम. आय. डी. सीतील "व्हेरिटास इंजिनिअरिंग या कंपनीत काम करणाऱ्या तब्बल दोनशे परप्रांतीय कामगारांची कंपनी व्यवस्थापनाने अन्न , धान्यसह किराणा माल देवून सेवा पुरविली आहे. त्यामुळे या कामगारांची लॉकडाऊनच्या काळातील भटंकतीसह , उपासमार व स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे.

 येथील "व्हेरिटास इंजिनिअरिंग कंपनीत मोठमोठ्या इंडस्ट्रीज, कारखाने उभारण्यासाठी लागणारे मोठमोठे लोखंडी खांब व वेगवेगळे साचे तयार करण्यात येतात. हे काम करण्यासाठी या कंपनीत उत्तर प्रदेश व बिहार या राज्यातील जवळपास दोनशे कामगार आहेत. ते एम. आय. डी. सी परिसरात आपल्या कुटूंबासमवेत राहत आहेत. मात्र देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर कंपनीही बंद करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात कामगारांची उपासमार , गैरसोय व कामगार आपल्या गावाकडे जावू नयेत. यासाठी 'व्हेरीटास कंपनी' चे सर्वेसर्वा दिलीप भापकर यांनी कामगारांना दैनंदिन लागणारा किराणा माल , अन्न धान्य घरपोच दिले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात या कंपनीतील कामगारांची भटंकती व स्थलांतर थांबले आहे. तसेच कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठीही मोठी मदत झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर कामगारांचा तुटवडा निर्माण होणार नाही.

दिलीप भापकर म्हणाले, " आमच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे हातावर पोट आहे. बंदच्या काळात कामगारांची गैरसोय किंवा भटंकती होवू नये, यासाठी सर्वच कामागाराना आमच्या कंपनीकडून त्याना लागणारा किराणा माल घरपोच करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कामगार आपल्या कुटूंबासमेवत घरातच आहेत. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर कंपनीचे काम पूर्ववत करणे सहज शक्य होणार आहे. " 


संबंधित बातम्या

Saam TV Live