सीना नदीत कायमस्वरूपी पाणी सोडवण्यासाठी नदीकाठच्या गावांचे सरकारला साकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

सोलापूर : सीना नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे, यासाठी नदीकाठच्या गावांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजप सरकारला साकडे घातले आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली ही मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा करमाळा तालुक्‍यातील व उस्मानाबाद, नगर जिल्ह्यातील सीनेकाठच्या गावांना उपयोग होत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण या महत्त्वाकांक्षी योजनेत सीना नदीचा समावेश करण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. 

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मांडलेल्या कृष्णा- भीमा स्थिरीकरण योजनेवरून राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढे भाजपचे उमेदवार निंबाळकरही अनपेक्षित मताधिक्‍याने माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. उजनी धरणासाठी करमाळा तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणात क्षेत्र गेले असले तरी संपूर्ण भागात पाणी पोचलेले नाही. तालुक्‍याच्या पूर्व भागाला सीना नदीच वरदायिनी ठरलेली आहे. मात्र, या नदीत आता कायम पाणी राहत नाही. त्यामुळे सतत या भागाला टंचाईचा सामना करावा लागतो. नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे म्हणून अनेकदा आंदोलने झाली. परंतु अद्याप नदीत पाणी आलेले नाही. 

काही वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील चौंडी येथून कुकडच्या कालव्याद्‌वारे सीना नदीत पाणी आले होते. कुकडीचे पाणीही आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नाने कामोणेपर्यंत आले आहे. तेच पाणी पुढे सोडले तर यातीलही काही गावांचा प्रश्‍न सुटू शकेल. 

सीना नदीवर करमाळा तालुक्‍यातील खडकी, तरटगाव, पोटेगाव, संगोबा येथे कोल्हापुरी पद्धतीचे लघु पाटबंधारे आहेत. या बंधाऱ्यात पाणी येणे आवश्‍यक आहे. सीना काठच्या गावात कायम पाणी नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या नदीवर कोळगाव येथे धरण आहे. त्यातही पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. बंधाऱ्यात पाणी आले तर धरणातही पाणी सोडता येऊ शकते. पाणी नसल्यामुळे तरुण रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर करत आहेत. शेतीसह या भागातील गावांना पाणीपुरवठा व्हावा म्हणून पाणीपुरवठा योजना तयार केल्या आहेत. परंतु दरवर्षी पाण्याअभावी त्या बंद पडत आहेत. 

web tittle-  Release the water in the river Sina permanently

संबंधित बातम्या

Saam TV Live