134 देशांना रिलायन्स भारी, अर्ध्या पाकिस्तानाइतकी रिलायन्सची नेटवर्थ

साम टीव्ही
शनिवार, 1 ऑगस्ट 2020
  • 134 देशांना रिलायन्स भारी
  • अर्ध्या पाकिस्तानाइतकी आहे रिलायन्सची नेटवर्थ
  • जगभरात रिलायन्सच्या नेटवर्थचा डंका

कोरोना महामारीत देशभरातल्या उद्योगधंद्यांना जोरदार फटका बसलाय. दुसरीकडे एक कंपनी अशीही आहे जिच्यावर कोरोनाचा फारसा परिणाम झाला नाही. असं आम्ही का म्हणतोय.

एकीकडे कोरोना महामारीनं देशातल्या उद्योगधंद्यांना जोरदार फटका बसलाय तर दुसरीकडे एक कंपनी अशीही आहे जिच्या नफ्यावर कोरोनाचा फारसा परिणाम झालेला नाही. लॉकडाऊनदरम्यान या कंपनीनं अनेक बड्या कंपन्यांसोबत करार करत नफा कमावलाय. आम्ही बोलतोय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबाबत. सध्या या कंपनीची नेटवर्थ सुमारे १३ लाख कोटी झालीय.

रिलायन्सच्या नेटवर्थबाबत आम्ही बोलतोय कारण जगातल्या १३४ देशांचा जीडीपीही रिलायन्ससमोर टिकू शकत नाहीये. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर रिलायन्स एक देश असता तर जगातल्या १३४ देशांपेक्षा वरचढ असता. 

रिलायन्सच्या नेटवर्थसमोर भारताचे अनेक शेजारी देशही टिकू शकत नाहीत. रिलायन्सची नेटवर्थ अर्ध्या पाकिस्तानइतकी आहे. पाकिस्तानची जीडीपी २२ लाख कोटी आहे. श्रीलंकेची जीडीपी ६.५ लाख कोटी रुपये आहे तर नेपाळची जीडीपी १.८ लाख कोटी रुपये आहे, याचा अर्थ रिलायन्सची नेटवर्थ श्रीलंकेच्या दुप्पट आणि नेपाळच्या सातपट आहे. 

रिलायन्सच्या नेटवर्थसमोर जगातली १३४ देश टिकू शकत नाहीत. एक भारतीय कंपनी इतक्या देशांना भारी पडतेय, ही बाब भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live