पुणे मेट्रोचा अडीचशे कुटुंबांना दिलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 जून 2019

पुण्यातील फडके हौदाजवळील मेट्रोचे नियोजित मेट्रो स्थानक कसबा पेठेतील दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेवर हलविण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला आहे. यामुळे २४८ कुटुंबांना दिलासा मिळणार आहे,’’ अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी गुरुवारी येथे दिली. 

फडके हौद चौकाजवळ मेट्रोचे भुयारी स्थानक होणार होते. त्यासाठी सुमारे २४८ कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार होते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी त्याला विरोध केला होता. त्याबाबत तीन वेळा आंदोलने झाली होती. या पार्श्वभूमीवर मेट्रोचे स्थानक शाळेच्या जागेवर करण्याचा निर्णय महापालिकेच्या मदतीने घेण्यात आला आहे. या शाळेच्या जागेवर परिसरातील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचा या पूर्वीचा महामेट्रोचा प्रस्ताव होता. नव्या निर्णयामुळे एकाही कुटुंबाचे स्थलांतर करावे लागणार नाही. शाळेची जागा स्थानकासाठी देण्यास महापालिकेने तयारी दर्शविली आहे. त्याचे प्रवेशद्वारही निश्‍चित झाले आहे. यामुळे स्थानकाच्या खर्चातही बचत होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.

राज्य सरकार व महापालिकेची भूमिका
राज्य सरकारने काहीही हिस्सा देणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने खर्च द्यावा, अशी विचारणा केली आहे. दर वर्षी काही रक्कम देण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. मात्र, अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही, असे दीक्षित यांनी सांगितले.

Web Title: Metro 250 Family Brijesh Dixit

संबंधित बातम्या

Saam TV Live