रिमोटचा बटन सेल चिमुरड्याच्या पोटात फुटला अन्... 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 जून 2018

तुमच्या घरी लहान मुल असेल तर त्याची काळजी घ्या, ते बाळ काय करतं यावर लक्ष ठेवा. कारण पिंपरी-चिंचवडमध्ये एका चिमुकल्यानं रिमोटचा बटन सेल गिळल्याची घटना घडलीय. चिमुकल्यानं हा सेल गिळल्यानंतर तो पोटात फुगला.

हुजैफ तांबोळी असं या मुलाचं नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आळंदी इथं तांबोळी कुटुंबीय राहतात. आज सकाळी कुटुंबियांच्या आधी हुजैफ झोपेतून जागा झाला.

खेळता खेळता त्यानं टेबलवर ठेवलेला त्यानं रिमोट घेतला. तो काही वेळा आपटला. त्यातून बटन सेल बाहेर आला. त्या आवाजानं सगळे जागे झाले, पण तोपर्यंत हुजैफनं सेल गिळले होते. ही बाब लक्षात येताच रुग्णालयात धाव घेण्यात आली. दुर्बिणीच्या साह्यानं शस्त्रक्रिया करून सेल बाहेर काढण्यात आलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारची ही चौथी घटना घडलीय. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुल असेल तर त्याची काळजी घ्या

संबंधित बातम्या

Saam TV Live